ABP CVoter Survey: निवडणूक आयोगाने 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दरम्यान, निवडणुकीपूर्वी जात जनगणनेचा मुद्दा तापत असून प्रत्येक पक्ष त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे.
सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, संपूर्ण देशात जात जनगणना करण्याची विरोधकांची मागणी केंद्र सरकारने मान्य करावी का? या प्रश्नाच्या उत्तरात 49 टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे, तर 35 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. त्याच वेळी, 16 टक्के लोक यावर काहीही बोलू शकले नाहीत.
लोकसभा निवडणुकीत जात जनगणनेचा फायदा कोणाला?
याशिवाय सर्वेक्षणात असे विचारण्यात आले होते की, जर संपूर्ण देशात जात जनगणना झाली तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला फायदा होईल? तर या प्रश्नावर 28 टक्के लोकांनी याचा फायदा एनडीएला होईल, तर 34 टक्के लोकांनी याचा फायदा I.N.D.I.A आघाडीला होईल असे सांगितले. सर्वेक्षणात 15 टक्के लोकांनी इतर प्रादेशिक पक्षांना याचा फायदा होईल असे सांगितले, तर 23 टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या –
निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला सर्व राज्यांचे निकाल लागणार आहेत.
एबीपीच्या या सर्वेक्षणात 5 हजार 121 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. 7 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले.