राजगुरूनगर -राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित व दाखलपूर्व 3 हजार 734 प्रकारणांपैकी पैकी 1 हजार 459 प्रकरणे तडजोडीतून मिटवण्यात आली. यावेळी लोकअदालतमध्ये तब्बल 1 कोटी 96 लाख 84 हजार 878 रुपयांची वसुली झाली आहे.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 8) लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन न्यायाधीश एस. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश जी. बी. देशमुख, विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश डी. बी. पतंगे, पी. डी. देवरे. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, विधी सेवा समितीचे दयानंद निकम, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष कड, उपाध्यक्ष ऍड. निलेश पवळे, ऍड.हर्षा पांडे, ऍड. सागर मैड, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. पोपटराव तांबे, ऍड सुलभा कोटबागी, ऍड. गोरक्षनाथ शिंदे, ऍड. वैभव कर्वे, ऍड. स्वाती आचार्य, ऍड. संजय पानमंद, ऍड. संदीप घुले, ऍड. रोहिदास टाकळकर, ऍड. विक्रम कड, ऍड. अमोल घुमटकर, ऍड. रेश्मा वाघुले यांच्यासह बार असोशिएशनचे पदाधिकारी, वकील, विविध विभागाचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील न्यायाधीशांसह ऍड. पवन कड, ऍड. उज्वला माळी, ऍड.संदीप घुले, ऍड. रत्नमाला कौदरे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. दीपाली वाळूंज, ऍड. सुषमा आरुडे, ऍड. अमोल टाकळकर या बार असोशिएशनच्या सदस्यांनी पॅनेल जज म्हणून काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील बार असोशिएशनचे ऍड. सागर मैंड यांनी तर ऍड. हर्षा पांडे यांनी अभार मानले.
राजगुरूनगरातील लोकअदालतीमध्ये दरवेळी पक्षकारांचा मोठा सहभाग लाभला आहे. लोकअदालतच्या माध्यमातून तडजोडीतून जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करावा.
– डी. बी. पतंगे, सह दिवाणी न्यायाधीश, खेड न्यायालय