पुणे – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध संस्था-संघटना, पक्ष तसेच विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. गंज पेठेतील फुले वाड्यात या क्रांतिसूर्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती.
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे कॉंग्रेस भवन येथे फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश बागवे, ऍड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, संगीता तिवारी, बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते.
मराठा शिक्षण परिषद
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने म. फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे खजिनदार विजयसिंह जेधे, प्राचार्या डॉ. शुभदा घोलप, डॉ. विलास पाटील, डॉ. सुदाम शेळके, डॉ. प्रमोद फडतरे आदी उपस्थित होते.
झोपडपट्टी सुरक्षा दल
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते फुलेवाडा येथे फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी काशीनाथ गायकवाड, सुनील भिसे, रामकृष्ण बिडगर, आबा शिंदे, अरुणा तागड, संतोष कदम, सुरेखा भालेराव, अर्चना वाघमारे, उज्ज्वला भोसले आदी उपस्थित होते.
महिला कॉंग्रेस कमिटी
महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने म. फुले यांच्या पुतळ्याला कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनिता मुनोत, सुनीता नेमूर, शुभांगी वाखारे, बेबी राजे, नंदा ढावरे, सुवर्णा माने आदी उपस्थित होते.
एरंडवणे गणेशोत्सव मंडळ
एरंडवण गणेशोत्सव मंडळाच्यावतिने म. फुले जयंती साजरी करण्यात आली. मंत्रिमंडळात एकही महिलेला सामावून घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत कोथरूड महिला कॉंग्रेस अध्यक्ष मनीषा करपे, शारदा वीर, ऍड. सुमंगल वाघ यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर, सतीश खैरे, दादासाहेब आगवणे, संतोष बाहेती, गणेश धोत्रे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस
राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने ऍड. फैय्याज शेख यांच्या हस्ते म. फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरचिटणीस मनोहर गाडेकर, हमीद इनामदार, अनिल औटी, ऍड. श्रीकांत पाटील, संजय मोरे, सचिन कदम आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने म. फुलेंच्या समता भूमीतील पुतळ्याला खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मृणालिणी वाणी, दिव्या जाचक, सुचित्रा बडगुजर, सारिका पारेख, रत्ना नाईक, मीना चव्हाण, शालीनी जगताप, कल्पना शिंदे, ज्योती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान
कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि पुणे शहर भाजप महिला मोर्चा यांच्या विद्यमाने महिला मोर्चा विभागाच्या उपाध्यक्षा सुवर्णा भरेकर यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्या भागवत, रत्ना जगताप, नंदा तुपे आदी उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडी
पुणे जिल्हा बहुजन विकास आघाडीच्या वतीने म. फुले जयंतीनिमित्त समता भूमी येथील पुतळ्याला आघाडीचे अध्यक्ष धनंजय घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सनी रायकर, उमेश तेजी, खाजाभाई शेख, उमेश शिंदे, उपस्थित होते.
“डॉ. आढाव यांना महाराष्ट्र भूषण
म. फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पुणे शहर शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे. पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे, उपप्रमुख डॉ. अमोल देवळेकर आदींनी कार्यकर्त्यांसह समता भूमी येथे अभिवादन केले. गजानन थरकुडे, उत्तम भुजबळ, विशाल धनावडे, पल्लवी जावळे, पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या.
प्रियदर्शनी शिक्षण संस्था
प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या वतीने शशिकला कुंभार, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार यांच्या वतीने म. फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जीवन ज्योती प्रतिष्ठान
जीवन ज्योती प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. मनोज वाघमारे, कैलास घुगे, हर्षिता सोनवणे, मेनका कराळेकर, उपस्थित होते. ऑटस ब्लड बॅंकेच्या कर्मचारी व डॉक्टरांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
“डीसीएम’ सोसायटी
नाना पेठेतील अहिल्याश्रम येथील डीसीएम सोसायटीच्या वतीने जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले यांचे सातवे वंशज प्रशांत फुले, संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य आणि महर्षी वि.रा. शिंदे कला महाविद्यालय परिसरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयातील म. फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, संस्था प्रतिनिधी काजल शेवाळे, वर्षा पाटील, मुख्याध्यापिका शिल्पा भोसले, प्र. प्राचार्य डॉ. जे. के. म्हस्के, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, कार्यालयीन अधीक्षक किशोर भुजबळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. रूपाली भागवत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. जयश्री कांबळे यांनी मानले.