Abdu Rozik। टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस 16’ मध्ये स्टार शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांचा जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. । Abdu Rozik
मात्र, सध्या शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक हे अडचणीत सापडले आहे. या दोघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण कथित ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. या कायदेशीर प्रकरणावर दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे आणि याबाबत कोणाशीही बोललेले नाही. पण अब्दू रोझिकबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
अब्दु रोजिक मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, अब्दूला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले आहे. । Abdu Rozik
Abdu Rozik। काय आहे प्रकरण ?
खरं तर, अब्दू हा गायक आणि अभिनेता तर आहेच, पण त्यासोबतच तो बिझनेसमनही आहे. अब्दूचे अनेक देशांमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यानंतर अब्दूने मुंबईत ‘बुर्गीर’ नावाचे आलिशान रेस्टॉरंटही उघडले.
रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणखी काही कंपनीचे पैसे गुंतवले गेले आहेत. ही कंपनी ड्रग्जचा व्यवहार करते, अशी चर्चा आहे. याच प्रकरणी ईडीने अब्दूला समन्स पाठवले असून त्याची चौकशी सुरू आहे.
Abdu Rozik। अब्दु रोजिक कोण आहे ?
ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोजिक हे जगभरात मोठे नाव आहे. बिग बॉस 16 चा सर्वात लोकप्रिय स्पर्धक असलेला अब्दू चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
अब्दू गायन, अभिनय, म्युझिक व्हिडिओ आणि सोशल मीडियातून भरपूर कमाई करतो. भारतीय शोसोबतच त्याने आंतरराष्ट्रीय शो देखील केले आहेत. तो ग्लोबल आयकॉन बनला आहे. । Abdu Rozik