महिलेच्या पतीचा अहवाल मात्र निगेटीव्ह
सांगली (प्रतिनिधी)– अहमदाबाद (गुजरात) येथून साळशिंगे (ता. खानापूर) येथे आलेल्या तीस वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या पतीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
गुजरातहून सहा दिवसांपूर्वी हे दाम्पत्य साळशिंगे येथे आले होते. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. लक्षणे दिसताच मिरज येथील शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारी दाखल केले होते. रविवारी चाचणी अहवाल आला. पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पत्नीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.