वॉशिंग्टन – कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या मोठ्या वादळामुळे तेथील पजेरो नदीचा बांध फुटला असून पूराचे पाणी कॅलिफोर्नियाच्या शेतजमिनीमध्ये घुसले आहे. त्यामुळे हजारो जणांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. शनिवारी पहाटेपासून हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
वादळाचा परिणाम म्हणून होत असलेल्या संततधार पावसामुळे पूराचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे. सेंट्रल कोस्टच्या मॉनिटरी देशातील सुमारे 8,500 लोकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित व्हावे लागले आहे. याशिवाय पजेरो #Pajaro नदीकाठच्या सुमारे 1,700 लॅटिन शेतकऱ्यांनाही तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
Mandatory Evacuation orders issued for the Community of #Pajaro due to a #LeveeBreak. Please heed evac warnings/orders. Pajaro River levee broke early this morning resulting in active flooding. #Evacuate if told. #TurnAroundDontDrown @Cal_OES @CaltransHQ @CAgovernor pic.twitter.com/tDttiTcaC0
— California Governor’s Office of Emergency Services (@Cal_OES) March 11, 2023
पजेरो नदीचे पाणी शहरामध्ये घुसू नये म्हणून 100 फूट रुंदीचा बांध घालण्यात आला होता. मात्र पूराच्या पाण्यामुळे हा बंधारा फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून शुक्रवारपासूनच नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना करण्यात येत होती.
Iran : शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी 100 जणांना अटक, समोर आले धक्कादायक कारण…
कॅलिफोर्निया नॅसनल गार्डने सुमारे 50 जणांना वाचवले असून पजेरो नदीच्या पूराचे स्वरुप अधिक भीषण होण्याचा धोका आहे. पजेरो नदी सॅन्टा क्रूझ आणि मॉन्टेरी या दोन देशाच्या मध्यातून वाहते आहे. त्यामुळे पूराचा धोका या दोन्ही देशांना आहे. पूराचे पाणी दूषित असल्याने या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जाऊ नये, अशी सूचनाही केली गेली आहे.