एका दहा वर्षीय चिमुकल्याने बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारवर आपले पहिले स्केच बनवले होते. हे स्केच त्याच्या आईने सोशल मीडियावर शेअर केले होते. जेव्हा अक्षयची नजर या स्केचवर पडली तेव्हा त्यानेही त्यावर सुंदर अशी प्रतिक्रिया दिली.
हे स्केच मुलाच्या आईने अक्षयकुमारला टॅग करून शेअर करत लिहिले की, माझ्या दहा वर्षांचा मुलगा आदित्य शर्मा याचा हा पहिला स्केच आहे आणि त्याला आशा आहे की ते तुम्हाला आवडेल. मला माहीत आहे की ते परिपूर्ण नाही, परंतु त्याने शक्य तितके जुळवण्याचा प्रयत्न केला. मी आशा करतो की आपण हे पाहाल आणि शक्य असल्यास प्रत्युत्तर द्याल. धन्यवाद.’
Loved it! Please tell Aditya thank you, I’m honoured he chose me for his first sketch . Love and prayers always ♥️ https://t.co/b6LSBmAHBe
— Akshay Kumar (@akshaykumar) June 17, 2020
यानंतर अक्षयवरही ते पाहिल्यावर त्याने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. अक्षयने लिहिले, खूप छान. कृपया माझ्या वतीने आदित्यला धन्यवाद सांगा. मला चांगले वाटले की, त्याने मला त्याच्या पहिल्या स्केचसाठी निवडले. माझे प्रेम आणि प्रार्थना नेहमीच त्याच्यासोबत आहे.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा शेवटचा चित्रपट “गुड न्यूज’ होता आणि आता त्याचे पुढचे चित्रपट म्हणजे राघव लॉरेन्सचा “लक्ष्मीबम’, रोहित शेट्टीचा “सूर्यवंशी’, चंद्रप्रकाश द्विवेदीचा “पृथ्वीराज’ आणि आनंद एल. रॉयच्या “अतरंगी रे’ चित्रपटांची तो तयारी करत आहे.