नवी दिल्ली : तबलिगी जमातीमुळे देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचा आरोप होताना दिसतो आहे. देशातील तसेच परदेशातील अनेक नागरिक तबलिगी जमातीत सहभागी झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज आहे. तर, तबलिगी जमातींमधून परतलेल्या प्रत्येकानी आपली तपासणी करून घ्यावी असे अवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
तबलीगी जमात में सम्मिलित होकर आये तथा जनपद में छिपकर रह रहे जमातियों की सूचना देने पर 10000 रुपये का पुरस्कार घोषित करने के सम्बन्ध में वरिष्ठ पुलिस अधीक्षक श्री संतोष कुमार सिंह द्वारा दी गयी बाईट #UPPolice @Uppolice @adgzonemeerut @igrangemeerut pic.twitter.com/gyRRg3mADr
— Bulandshahr Police (@bulandshahrpol) April 11, 2020
मात्र तबलिगीमधील काही लोक अद्यापही फरार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील बुलंद शहर पोलिसांनी तबलिगीची माहिती देणाऱ्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी आझमगड पोलिसांनी 5 हजारांचे बक्षिस जाहीर केले होते.
पोलिसांना बुलंद शहरात काही तबलिगी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. तबलिगीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलीस दहा हजाराचे बक्षीस देणार आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी एक वॉट्सअप नंबर जरी केला असून, त्यावर नागरिकांनी माहिती द्यावी असे अवाहन बुलंद शहर पोलिसांनी केले आहे.
देशात सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात करोना संकट कमी व्हायला तयार नाही. करोना रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. सोमवारी दुपारपर्यंत यात आणखी ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्याही पुढे गेली आहे.