पिंपळे गुरव -आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका व आळंदी नगरपरिषदेला जाग आणण्यासाठी तोंडाला काळी पट्टया बांधून, स्लोगन द्वारे, अर्ध नग्न होऊन इंद्रायणीच्या पाण्याच्या पात्रामध्ये उतरून मूक आंदोलन मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थांच्या वतीने आळंदीत मंगळवारी (दि. 21) हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहर अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की, कार्तिकी यात्रेपर्यत ठोस उपाययोजना न केल्यास यापुढे अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही हरित लवादामध्ये याचिका दाखल करून न्याय मागू. यावेळी सर्व आंदोलकांना अण्णा जोगदंड यांनी पर्यावरण व नदी प्रदूषण न करण्याची शपथ दिली.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास कुचेकर, रवी भेंकी, संगीता जोगदंड, मीना करंजावणे, ऍड. अनंत काळे, गजानन धाराशिवकर, पंडित वनस्कर, शामराव सरकाळे, काळूराम लांडगे, बबन मगर, बाळासाहेब साळुंके, प्रकाश वीर, पाडूरंग नाडे, दशरथ कांबळे, तुकाराम इंगळे, बाबासाहेब पवार, नितीन गंगावणे, विनायक चव्हाण, अक्षय सोळुंके, आदी उपस्थित होते.