रेडा -करोनाला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे. त्या व्यक्तीच्या शरीरात 28 दिवसांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. एका प्लाझ्मादानाने दोन करोना रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्लाझ्मा दान केल्याने कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे भीती न बाळगता प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
प्लाझ्मा दान करून गंभीर करोना रुग्णांचा जीव वाचवलेल्या दिलीप दीक्षित व अमर निलाखे यांनी बुधवारी (दि. 28) हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी वरील आवाहन केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या दोघांचे कौतुक केले. करोना रुग्णांच्या गंभीर अवस्थेवरील उपचारांसाठी सध्या प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. सध्या रुग्णांसाठी प्लाझ्माचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे करोना रुग्णांना जीवदान देणारी प्लाझ्मादान ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे