राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली –  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.

याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की,”माझा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून मला कुठल्याही प्रकारचे लक्षण नाही. मी पूर्णपणे बरा आहे. कोविड प्रोटोकॉलच्या नियमानुसार मी विलीकरणात  असून माझे काम चालू राहणार आहे.”   

दरम्यान, कालच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घेत असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.