Entertainment : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुनची बहिण नागा सरोजा यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून सरोजा यांना श्वसनाचा त्रास होत होता. अखेर 17 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
नागा सरोजा या नागार्जुनची तिसरी बहिण होती. तेलुगू सिनेमांत अक्किनेनी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. असे असले तरी नागा सरोजा या सिनेसृष्टीपासून कायम दूर राहिल्या. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेविश्वातील लोकांसह राजकीय मंडळीनी शोक व्यक्त केला आहे. नागार्जुन यांच्या बहिणीच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागार्जुन यांचे वडील नागेश्वर राव अक्किनेनी यांची पाच मुलं आहेत. त्यापैकी नाग सरोजा तिसरी कन्या होती. सत्यवती, नाग सुशीला, नाग सरोजा, व्यंकट आणि नागार्जुन अशी त्यांच्या पाच मुलांची नावं आहेत. त्यातील सत्यवती यांचं निधन काही वर्षांपूर्वी झाले होते.
नागार्जुन अक्किनेनी हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर देखील प्रसिद्ध अभिनेते होते. 29 ऑगस्ट 1959 रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या नागार्जुन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नागार्जुन यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर प्रसिद्ध अभिनेते होते.