करीमनगर (तेलंगणा) – एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून फूटपाथवर बसलेल्या चार महिलांना चिरडून मारल्याची घटना तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात घडली आहे.
एसयुव्ही पद्धतीची ही गाडी होती. एक अल्पवयीन मुलगा ती चालवत होता. त्याचे वेगावर नियंत्रण राहिले नाही व एकेठिकाणी ही गाडी थेट फुटपाथवर आदळली, त्या ठिकाणी बसलेल्या चार महिला त्या खाली चिरडल्या गेल्या. गाडीची धडक वेगवान असल्याने या चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात आयपीसीच्या कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गाडी त्याच्या कुटुंबियांच्याच मालकीची होती असे सांगण्यात येत आहे. सदर मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना अर्थातच नव्हता.