अहमदनगर – अहमदनगर मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिलेने पेटलेल्या असवस्थेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. ही घटना अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पूजा मनोहर चुग, वय 33 असे या महिलेचे नाव आहे. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे पुज्या यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. याशिवाय भाजल्यामुळे त्या जखमाही झाल्या आहेत. पूजा यांनी पेटवून का घेतले हे अद्याप समोर आले नाही. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरावरून पूजा यांना पेटलेल्या अवस्थेत खाली पडताना येथील स्थानिकांनी पाहिले असता त्यावेळी त्या जोरजोरात ओरडत होत्या. असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.