कोपरगाव (प्रतिनिधी) – शहरातील सराफ बाजारातील सोन्याचांदीच्या बंद दुकानाला आग लागल्याने दुकानाचे नुकसान झाले. मात्र मोठी दुर्घटना टळली असुन यातसुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
कोपरगाव शहरातील सराफ बाजारमधील योगेश दत्तात्रय निकुंभ यांचे सोने चांदीचे श्री मंगलयोग आलंकार दुकान आहे. ते त्यांनी सायंकाळी बंद करुन घरी गेले मात्र दुकानातुन रात्री ८च्या दरम्यान अचान आगीचे लोळ बाहेर येवु लागल्याचे स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आल्याने एकच पळापळ सुरू झाली.
नागरीकांनी तातडीने कोपरगाव नगरपालीकेच्या अग्निशमन दलाला फोन करुन घटनेची माहीती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अग्निशमन दलाचे प्रमुख संभाजी कार्ले, वाहन चालक प्रशांत शिंदे, फायरमन रघुनाथ राक्षे, शाम न्नवरे यांनी तातडीने अग्निशामक बंबच्या साहाय्याने लागलेली आग अवघ्या काही क्षणात विजवल्याने सराफ बाजारातील इतर दुकाने बालंबाल वाचले आहेत. तर घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या पोलीस पथकासह हजर राहुन मदतकार्य केले.
सराफ बाजारात सोन्या चांदीचे अनेक दुकाने एकमेकांना खेटुन थाटलेले आहेत शिवाय शेजारी दाट लोकवस्ती चिकटून असल्याने जर या लागलेल्या आगीने शेजारचे दुकाने पेटले असते तर संपूर्ण सराफ बाजार अग्नितांडवाने होरपळून गेले असते मात्र पालीकेच्या अग्निशमन दलाने सतर्कता द खवून तातडीने आग विजवल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान नागरीकांनी व्यक्त केले.
दरम्यान दुकानातील देवासमोर दिवा लावून ठेवला होता आणि त्या दिव्यामुळे आग लोक गली असावी त्यात आपल्या दुकानाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहीती दुकान मालक योगेश निकुंभ यांनी दिली.