`सेवेचे ठायी´ या पुस्तकाबरोबर शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या `ज्ञानदीप´ वार्षिक नियतकालिक १२ व्या अंकाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहासातील दीपस्तंभप्रमाणे `ज्ञानदीप´ वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना विशेष आनंद होत आहे. हा अंक ज्ञानाचा अखंड विलास आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीचा व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सर्व कलागुणांचे व त्यांच्या भावविश्वाचे ते खरोखर वास्तव प्रतिबिंब आहे. ज्ञानदीप महाविद्यालयाच्या प्रगतीचा आरसा व चढता प्रगतीचा आलेख आहे.
विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवन हे संवेदनशील जीवन असते. अभ्यास करून निश्चित ध्येयाकडे वाटचाल तर सुरूच असते. त्याचबरोबर स्वतःमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून कसदार उतरवण्यासाठी, ज्ञानदीप हे एक उत्तम माध्यम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा देशाचा एक उत्तम नागरिक असतो. विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख हवी, त्यांच्याकडून चांगले साहित्य लिहिले व वाचले जावे, या हेतूने त्यांचे मत, भाव-भावना, आर्थिक, सामाजिक दृष्टिकोन मांडण्यासाठी प्रत्येक वर्षी ज्ञानदीप हा अंक प्रकाशित केला जात असतो.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून `सेवेचे ठायी´ या पुस्तकात करोना काळातील, करोना यौद्ध्यांनी केलेल्या कामाचा आलेख मांडला. यातून मानवी मूल्ये कशी जोपासण्यात आलेली आहेत ते सांगितले.
याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक किशोर धनकवडे, काकासाहेब चव्हाण, आप्पासाहेब रेणुसे, आश्विनी भागवत, श्रद्धा परांडे, सचिव वैभव तांबे, कोषाध्यक्ष मयूर ढमाले, प्रशासकीय संचालक राजीव पाटील, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, डॉ. प्रमोद इंगळे, मुख्याध्यापक अतुल पानसरे, मुख्याध्यापिका शीतल पाटील व कार्यकारी संपादक डॉ. पांडुरंग मिसाळ यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिन डिंबळे यांनी मानले. पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रवीण डोळस यांनी दिली.