वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय भुकंप

वडगाव शेरी : माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा हजारो कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. विद्यमान आमदार जगदिश मुळीक आणि बापूसाहेब पठारे मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहेत. लवकरच मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रवेश होणार असल्याच्या वृत्ताला स्वतः पाठारे यांनी दुजोरा दिला आहे.

या संदर्भात बोलताना पाठारे म्हणाले की, मी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली होती. मी माजी आमदार झाल्यापासून मला पक्षाने विचारले नाही. पाच वर्षात एका ही बैठकीला बोलवले नाही.

माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे मी भाजप मध्ये जात आहे. पवार कुटुबांचा मला नेहमी आदर आहे. आता वडगाव शेरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी माझ्या सह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

दरम्यान वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि सुनिल टिंगरे यांच्यात या मतदार संघात लढत होणार आहे. आता पाठारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Ads

3 COMMENTS

  1. The dirty politics. People know all reasons now people are angree. and there is no effect of such earthquack. The impact will be more strong due to this. The result will show the people power now.

  2. Yes tat true BOSS. We already declared that. and zero progress in 5 years. Ek aadmi le gaye……janata to le ja nahi sakte na.
    people know what happend and what tomorrow will happen. So, the ball is now in the hand of people. All people took meeting
    tonight and MLA lost remaining respect also.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)