मुंबई – मुंबईत बिग बॉस या रिऍलिटी शोच्या सेटवर आग लागल्याची घटना घडली ओ. हिंदी व्हर्जनचा पंधरावा सीझन काही दिवसांपूर्वीच संपला. सेटवर शूटिंग सुरू नव्हते. यामुळे आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
सलमान खान पंधराव्या सीझनचा होस्ट होता. हिंदी बिग बॉसचे शूटिंग मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे तयार केलेल्या सेटवर होत होते. पण सीझन संपल्यानंतर शूटिंग पण बंद झाले होते. सेटवर जास्त गर्दी गडबड नव्हती.
प्राथमिक माहितीनुसार सेटवर आज (रविवार) आग लागली. आग लागताच अग्नीशमन दलाच्या चार बंब गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. आग विझविण्यासाठी तातडीने कारवाई सुरू झाली आहे. सेटवर आग लागल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. पण किती नुकसान झाले याचे नेमके आकडे कळण्यास वेळ लागेल.
हिंदी बिग बॉसच्या मागच्या सीझन मध्ये तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री विजयी झाली. तेजस्वीने एकता कपूरच्या नागीन मध्येही भूमिका केली आहे. तसेच रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या शो मध्येही ती सहभागी झाली होती.