पिंपरी, (प्रतिनिधी)- शहरात वेगवेगळया ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे सवंर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेचा लाखोंचा रूपयांचा खर्च केला आहे. तापकीर चौक, थेरगाव रूग्णालयासमोर महापालिकेने झाडे लावण्यासाठी पक्का चौथरा बनविला आहे. या चौथर्यात झाडे असणे अपेक्षित आहेत परंतु तिथे कचरा टाकण्यात येत आहे.
काही महिन्यांन पूर्वी महापलिकेने झाडासांठी पक्के स्ट्रॅक्चर तयार करून त्यात झाडे लावली होती. परंतु आता काही ठिकाणी हे तुटले आहेत तर काही ठिकाणी याची कचराकुंडी झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेला पदपथ सुशोभित करत अतिशय सुंदर प्रकारचे चौथरे बनविण्यात आले होते.
परंतु बनवून सोडून देण्याची वृत्ती येथेही मारक ठरली आहे. हे चौथरे व्यवस्थित आहेत का? यात झाडांची वाढ नीट होत आहे का? याकडे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी हे चौथरे तुटले आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांची वाढ झाल्याने चौथरे ढासळले आहेत.