ठाणे – ठाणे मेट्रो मार्गावर बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी ठेकेदार आणि मुंबई मेट्रो अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळा येथील मुंबई ते कासारवाडावली या 32.32 किमी मार्गावरील मेट्रो लाइन 4 वर सध्या काम सुरू आहे.
या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी कंत्राटदार आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर मेट्रो लाईन 4 प्रकल्पासाठी बेकायदा वृक्षातोड केल्याबाबत महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) संरक्षण व वृक्ष संरक्षण अधिनियम 1975 च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.
याबाबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारण केली होती. त्यानंतर महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी विनापरवानगी मध्यरात्रीच्या वेळे वृक्षतोड केली होती.
या वृक्षतोडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती. यावेळी महापौर म्हस्के यांनी संताप व्यक्त केला होता.