पुणे – शाळेतील फिजीकल एज्युकेशन(पी.टी) शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारुण तसेच चुंबन घेऊन विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा शिक्षण मागील दोन ते तीन महिण्यापासून असे करत होता. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान चार विद्यार्थीनींनी हा प्रकार सांगितला. यानंतर संबंधीत शिक्षकाची शाळेच्यावतीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अविनाश गोविंद चिलवेरी (23, रा.बिडी कामगार वसाहत, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने 37 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चिलेवार विरुध्द पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आरोपी तेथे सात ते आठ महिण्यापुर्वीच पी.टी.शिक्षक म्हणून रुजू झाला होता. तो मागील दोन महिण्यांपासून तेथील विद्यार्थीनींना जबरदस्ती मिठी मारुन चुंबन घेत होता. तसेच त्यांना व्हॉटसअपव्दारे आयलव्हयू मेसेजही पाठवत होता. हा प्रकार नोव्हेंबर पासून सुरु होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या समुपदेशादरम्यान शाळेतील चार मुलींनी हा प्रकार समुपदेशकांना सांगितला. त्यांनी ही बाब शाळेच्या शिक्षीकेच्या निदर्शनास आणून दिली.