Annapoorani : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री ‘नयनतारा’चे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अश्यातच नयनताराच्या आगामी ‘अन्नपूर्णानी’ या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
हा चित्रपट वादात सापडला आहे. नयनताराच्या ‘अन्नपूर्णानी’ विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजते. अभिनेत्रीच्या या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी ‘अन्नपूर्णानी’च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी चित्रपटावर अनेक आरोप केले आहेत. या चित्रपटाने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचं ते म्हणतात.
यापूर्वी त्यांनी ‘अन्नपूर्णानी’बाबत पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी होत नसल्याने त्यांनी निर्मात्यांवर रामाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नयनताराच्या चित्रपटाला हिंदूविरोधी म्हटले आहे.
त्यांनी चित्रपटातील अनेक गोष्टी वादग्रस्त असल्याचेही सांगितले आहे. याशिवाय अशा चित्रपटांमुळे लव्ह जिहाद वाढतो, असे त्यांचे मत आहे. निर्मात्यांसह सोलंकी यांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ते असेही म्हणतात की यावेळी देशातील प्रत्येकजण भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकाच्या अपेक्षेने उत्सव साजरा करत आहे. दरम्यान, अन्नपूर्णानी असा हिंदुविरोधी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना ते म्हणाले की, या चित्रपटात अभिनेत्रीचे वडील पुजारी दाखवण्यात आले आहेत. ज्याची भगवान विष्णूवर श्रद्धा आहे तो त्यांना नैवेद्य दाखवतो. दुसरीकडे, त्याची मुलगी मांस खाते, मुस्लिमांवर प्रेम करते आणि रमजान इफ्तार करताना दाखवले जाते. असं ते म्हणाले आहेत.