मुंबई – आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरूनही विरोधकांनी मी स्वप्नात दिसतो. तरीही महाराष्ट्रातील जनता माझ्याच पाठीशी आहे हे देखील ते जाणून आहेत असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आज वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या समर्थकांना संबोधित करताना बोलत होते.
ते म्हणाले की, माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरूनही, विरोधक मला त्यांच्या स्वप्नात पाहतात. त्यांना माहित आहे की उद्धव ठाकरे एकटे नाहीत, संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. प्रेम आणि आपुलकी विकली जात नाही. या भावना विकत घेता येत नाहीत,असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील काही राजकीय कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केल्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की,खरी लढाई पुढे आहे, परंतु सर्व निष्ठावंतांनी एकत्र राहून संघर्ष केल्यास संघर्षांवर मात करता येते.
मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्य-बाण’ चिन्ह दिले होते त्या अनुषंगाने ठाकरे यांनी सतत शिंदे गटाला लक्ष्य केले आहे