विशाल भालेराव
खडकवासला – किल्ले सिंहगडावर हवेली तालुक्यातील मोशी येथुन सहलीसाठी आलेला इयत्ता बारावीचा विद्यार्थी हत्ती टाक्यात ( elephant tank sinhgad fort ) बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील विद्यार्थ्याचे नाव शाहिद मुल्ला ( shahid mulla ) असे आहे. तो मोशी येथील एका खासगी विद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता. गडावरील स्थानिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत संबंधित विद्यार्थ्याला पाण्यातून बाहेर काढले आहे. जास्त वेळ पाण्यात राहिल्याने सदर विद्यार्थ्याचा जीव धोक्यात असल्याची शक्यता आहे. ( school student drawned at sinhgad fort )
मोशी येथील एका खासगी विद्यालयाचे इयत्ता बारावीचे साठ विद्यार्थी व चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. हत्ती टाके परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट पाण्यामध्ये पडला. स्थानिक रहिवाशी आणि घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर, विठ्ठल पढेर,आकाश बांदल,विकास जोरकर, सुरेश शिवतरे यांनी पोहता येत असल्याने तात्काळ पाण्यामध्ये उतरून शाहिदचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अखेर प्रयत्नांची पराकाष्टा करत स्थानिकांनी शाहिद मुल्ला यास पाण्यातून बाहेर काढले आहे. सिंहगडावर पर्यटन करणाऱ्या एका युवका ने त्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार केले परंतु तो बेशुद्धच असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले सिंहगडावर जोरदार पाऊस सुरू असल्याने हत्तीटाके पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांकडून वर्तवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक व विद्यार्थी या दुर्दैवी प्रकारामुळे घाबरलेले आहेत. ( school student drawned at sinhgad fort )
नांदेड सीटी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन केंद्राला याबाबत कळवण्यात आले होते. अग्निशमन दलाचे जवान येण्या अगोदरच स्थानिकांनी बुडालेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढले आहे. सिंहगडावरील रहिवाशी म्हणजे एक रेस्क्यू टीमच आहे परिसराची माहिती आणि अनुभव असल्यामुळे आणि गडावरील सर्व टाक्यांची माहिती असल्यामुळे ते तात्काळ संतत धार पावसात तुडुंब भरलेल्या हत्ती टाक्यात उतरले. आणि विद्यार्थ्यांचा शोध घेतला.
सिंहगडावर ८०पेक्षा जास्त टाके असून टाक्यांच्या परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने फिरत असतात 2008 मध्ये काही टाक्यांना संरक्षक कठडे म्हणून पाईपचे कठडे करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तुटफूड झाली तर काही पाईप काढून देखील नेण्यात आले. यामुळे गडावरील टाके विना कठड्यांचेच राहिले त्यावर परत कोणीही लक्ष न दिल्याने आणि हत्ती टाक्याला सुरक्षा कठाडे नसल्याने या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. ( school student drawned at sinhgad fort )