नवी दिल्ली -भारताचे महान क्रिकेटपटू कपिलदेव यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तसेच छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अतुल माथूर कपिल यांच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती घेत आहेत.
त्यांना दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कपिलदेव यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर स्वतः कपिल देव यांनीच रुग्णालयातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता व चाहत्यांचे आभार मानले होते.