मुंबई – रॅपर बादशाह सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव असतो. त्याचे गाणे रिलीज होताच ते व्हायरल होते आणि टॉप ट्रेंडिंगच्या यादीत त्याचा समावेश होतो. मात्र यावेळी बादशाहने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहेत.
बादशाहने शेअर केलेल्या फोटोत त्याचा चेहरा भाजल्यासारखा दिसतो आहे. उन्हामुळे त्याची त्वचा खराब झाली आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
बादशाहच्या या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्याचा नाक, गाल, संपूर्ण चेहऱ्यावरती त्वचा सोलली गेली आहे. त्याचप्रमाणे चेहरा लाल देखील झाला आहे. त्याची ही अवस्था मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर झाली आहे.