बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या आगामी “बधाई दो’ चित्रपटासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांची जोडी झळकणार आहे. भूमीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर करत लिहिले की, “बधाई दो, तयारी सुरू.’ हा चित्रपट “बधाई हो’ फ्रेंचाइजीचा दुसरा भाग आहे.
यात राजकुमार राव हा दिल्ली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जो एका महिला पोलीस ठाण्यात एकमात्र पुरुष पोलीस अधिकारी आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर भूमी म्हणाली होती की, यापूर्वीही मी अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
परंतु “बधाई दो’मधील माझी भूमिका ही खूपच खास आहे. जेव्हा मी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली, तेव्हाच मला ती भूमिका फारच आवडली होती. या एक प्रासंगिक विषय असून तो खूपच मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे.
मी पहिल्यांदाच राजकुमारसोबत काम करत असल्याने मी सुपर एक्साइटेड आहे. दरम्यान, “बधाई दो’ची कथा ही लेखक अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांनी लिहिले आहे. तसेच हर्षवर्धन कुलकर्णी हे दिग्दर्शन करणार आहेत.