आठवडे बाजार, विपश्यना केंद्रांनाही परवानगी
पुणे – ग्रंथालये सुरू करण्यास राज्य शासनाने सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील ग्रंथालयांच्या वेळाही बुधवारी जाहीर करण्यात आल्या.
पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील खासगी व शासकीय ग्रंथालये सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान सुरू राहतील.
सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागात स्थानिक आठवडे बाजार (जनावरांच्या बाजारासह) सुरू करण्यास परवानगी राहील. तसेच विपश्यना केंद्र यांनाही सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे.