लखनौ – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली. या ट्विटमध्ये यादव यांच्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे एकही लक्षण नसल्याचं सांगण्यात आलंय. मुलायम यांचे पुत्र व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील या वृत्ताला पुष्ठी दिली आहे.
समाजवादी पार्टी संस्थापक आदरणीय नेताजी श्री मुलायम सिंह यादव जी की कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आने के उपरांत चिकित्सकों की देख रेख जारी है।
फिलहाल उनमें कोरोना के एक भी लक्षण नहीं हैं।
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 14, 2020
अखिलेश यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत अधिक माहिती देताना, “माननीय नेताजींची (मुलायम सिंह यादव) यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारांसाठी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी वरिष्ठ डॉक्टरांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्या प्रकृतीबाबत तुम्हाला माहिती देत राहील.” असा संदेश लिहला आहे.
माननीय नेताजी का स्वास्थ्य स्थिर है. आज कोरोना पॉज़िटिव होने पर गुड़गाँव के मेदांता में उन्हें स्वास्थ्य-लाभ के लिए भर्ती कराया था.
हम वरिष्ठ डॉक्टरों के निरंतर संपर्क में हैं और समय-समय पर सूचित करते रहेंगे.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) October 14, 2020