न्यूयॉर्क – जेम्स बॉंडच्या गोल्डफिंगर या चित्रपटाद्वारे जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्री मार्गारेट नोलन यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र ऑस्कर डिक्स यांनी दिली.
पूर्वाश्रमीच्या मॉडेल असलेल्या मार्गारेट नोलन यांना अ हार्ड डेज नाइट आणि विनोदी चित्रपट कॅरी ऑनमधील भूमिकेसाठीही प्रसिद्ध मिळाली होती. शॉन कॅनरी यांच्यासोबत 1964 च्या गोल्डफिंगरमध्ये झळकल्यानंतर त्या एकदम प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर प्लेबॉय मासिकासाठीही पोझ दिली होती.