मुंबई – बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते असे संकेतही त्यांनी दिले. आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह आणखी 20 जणांच्या नावांचा समावेश आहे. यावरून भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे. https://t.co/YaRorAy1Qs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 8, 2020
निलेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका म्हणाले की,’या स्टार कॅम्पेनर्सना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचले नाही हा इतिहास आहे.’ असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली.
कोण आहेत स्टार प्रचारक ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असणार आहे.