बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेननने भलेही लग्न केले नसले, तरी ती दोन मुलींची आई आहे. रिनी आणि अलीशा अशी त्यांची नावे असून सूष्मिताने 2000 मध्ये रिनीला एडॉप्ट केले होते. तर 2010 मध्ये अलीशाचे पालकत्व स्वीकारले होते.
आता सुष्मिताची मोठी मुलगी रिनी बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. रिनी ही “सुट्टाबाजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या चित्रपटाचे कथानक हे करोना व्हायरसवर आधारित असून यात लॉकडाउनच्या काळात नात्यांमध्ये झालेले परिणाम दर्शविण्यात येणार आहे. अद्याप चित्रपटाबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नसून यात रिनी एका बिगडॉलची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा हे रिनेच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. रिनेच्या या डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराना हे करणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे समजते.