पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बॅकलॉग आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर केले. त्यानुसार या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यापीठाकडून 12 ते 31 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यात बहुपर्यायी स्वरुपाची प्रश्नपत्रिका असेल. या परीक्षेचे स्वरुप विद्यार्थ्यांना कळण्यासाठी 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान सराव चाचण्यांची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्यानुसार प्रत्येक विषयाचे स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विद्यापीठाने विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोणत्या विषयाची ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा कोणत्या दिवशी आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे.
वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या पोर्टलवर “शेड्युुल ऍण्ड टाइमटेबल्स’ यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सर्वात शेवटी “टाइमटेबल्स’वर क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्याशाखानिहाय वेळापत्रक असून, त्यात विषयनिहाय परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे.