चिंबळी -पत्रकारही करोना योद्धेच आहेत. या महामारीच्या काळातही ते जीवाची परवा न करता वार्तांकन करीत आहेत. करोना काळातही समाजातील योगदान कायम राहिले आहे.
त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्य वतीने खेड तालुक्यातील पत्रकारांना आरोग्य कीट प्रदान करण्यात आले. तसेच आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पत्रकारांना सॅनिटायझर, “सी’-“डी’ व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.