गुगल अन्याय करीत आहे; पेटीएमचा आरोप

नवी दिल्ली – भारतामध्ये यूपीआय कॅशबॅक योजना कायदेशीर आहे. मात्र, ही योजना सुरू केल्याबद्दल गुगल कंपनीने आपल्या ऍप स्टोअरवरून पेटीएम मर्यादित काळासाठी काढून टाकले होते. हा दादागिरीचा प्रकार आहे, असे पेटीएमने म्हटले आहे.

मात्र, गुगलने आठवड्यात केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. जर पेटीएमने पुन्हा असा अयोग्य प्रकार केला तर हे ऍप गुगल प्लेवरून काढून टाकण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावर पेटीएम कंपनीने म्हटले आहे की, गुगल प्ले स्वतः क्रिकेट आधारित काही योजना सुरू करीत आहे. गुगल प्ले स्वतःच्या आणि इतरांच्या ऍपला वेगवेगळे नियम लावीत आहे. 18 सप्टेंबर रोजी गुगल प्लेवरून पेटीएम अदृश्‍य झाले होते. मात्र, नंतर पेटीएमने आयपीएल क्रिकेट स्पर्धेसंदर्भातील आपल्या काही योजना परत घेतल्यानंतर हे ऍप सुरू करण्यात आले.

यावर गुगल प्लेने म्हटले आहे की, सर्व प्रकारची योग्य शहानिशा केल्यानंतरच पेटीएम अमर्यादित काळासाठी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आमचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत. कुणालाही अपवाद करणे बरोबर होणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.