ओतूर – श्री गाडगेमहाराज मिशन मुंबई संचलित ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गाडगेमहाराज विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक साहेबराव मायंजी कडाळे हे 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. साहेबराव कडाळे हे उत्तम चित्रकार आहेत.
विद्यालयात त्यांनी चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे सातत्याने 30 वर्षे आयोजन केले होते. तसेच विद्यालयाचे उन्मेष या हस्तलिखित नियतकालिकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचे काम करीत होते. चित्रकला परीक्षांचे निकाल सातत्याने 100 ते 98 टक्के लावून अनेक चित्रकार निर्माण केले आहेत.