अहमदनगर: गुरू आनंद कोविड केअर सेंटरमधून 500 रुग्ण ठणठणीत

गुरु आनंद कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिलासा : आमदार संग्राम जगताप

गुरु आनंद कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिलासा : आमदार संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी) –
नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत असले तरी ठणठणीत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. करोना रुग्णांना आपुलकीची सेवा देऊन त्यांचे शारिरीक दुखणे बरे करतानाच त्यांचे मनोबल कायम राखणे गरजेचे असते. गुरु आनंद कोविड केअर सेंटरमध्ये अशीच काळजी घेतली जात आहे. आचार्यश्री आनंदषीजी महाराज यांच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे तंतोतंत पालन करीत रुग्णांना सेवा दिली जात आहे. कोविड सेंटरच्या टिमने आपल्या सेंटरचे नाव सार्थ ठरवणारे काम चालवले आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

गुरु आनंद कोविड फाउंडेशनच्यावतीने मागील दीड महिन्यापासून आयुर्वेद महाविद्यालयात तसेच बडीसाजन मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर चालवण्यात येत आहे. या सेंटरमधून आतापर्यंत 500 रुग्ण बरे होऊन उत्साही मनाने घरी परतले आहेत. यातील बरी होऊन घरी परतणाऱ्या एका दहा वर्षाच्या मुलीला आ.जगताप यांनी कॅडबरी देऊन गोड निरोप दिला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अमित मुथा, कमलेश भंडारी, शैलेश मुनोत, रोशन चोरडिया, शाम भुतडा, तुषार चोरडिया, चेतन भंडारी तसेच कोविड सेंटरमधील वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.

यावेळी धनेश कोठारी म्हणाले, महिनाभरापासून गुरु आनंद कोविड फाउंडेशनचे सदस्य चोवीस तास आयुर्वेद हॉस्पिटल व बडीसजन मंगल कार्यालय येथे सेवा देत आहेत. कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दगावला नाही हे सर्वात मोठे यश आहे. गुरु आनंद कोविड सेंटर येथे आलेल्या रुग्णांची घरच्या सारखीच काळजी घेतली जाते. सकाळपासून ते रात्री पर्यंतची दिनचर्या तयार करण्यात आली आहे. सकाळी सर्वप्रथम योगाभ्यास घेतला जातो. हायजेनिक, सकस आहार रुग्णांना दिला जातो. सेंटरमध्ये फिजिशियनची व्यस्था करण्यात आली आहे. इथे आलेला प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाला करोना निगेटिव्ह करण्यासाठी आवश्‍यक उपचार केले जातात. कोविड सेंटरमधील सकारात्मक वातावरण रुग्णांच्या मनातील नकारात्मकता दूर करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.