186 नागरिकांना दिला डिस्चार्ज
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 589 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 15,247 एवढी झाली आहे. तर आज 17 जणांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे एकूण 414 रुग्णांचा बळी गेला आहे. तर आज 186 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,778 एवढी आहे.
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालातील 589 रुग्णांचा तपशील आज मिळणार आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 186 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 617 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 45723
एकूण बाधित – 14658
घरी सोडण्यात आलेले – 7778
मृत्यू – 414
उपचारार्थ रुग्ण – 6466