सलमान खानचा पॉप्युलर रियॅलिटी शो “बिग बॉस’चा चौदावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही चाहते या शोसाठी खूप उत्साहित आहे. दुसरीकडे शोबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. यात होस्ट सलमान खानच्या मोबदल्याबाबत अंदाज लावला जात आहे. दरवर्षी सलमान खानच्या मानधनात वाढ होत असते. परंतु यावेळी हा आकडा खूपच वाढला असल्याचे समजते.
“बिग बॉस 14’साठी सलमान खान सुमारे 250 कोटी रुपये मानधन घेणार आहे. या शोसाठी तो आठवडयातून दोन दिवस शूटिंग करणार आहे. यासाठी सलमानला सुमारे 20.50 कोटी रुपये फी देण्यात येणार आहे. याचा हिशोब केल्यास एका एपिसोडसाठी तो 10.25 कोटी रुपये घेणार असल्याचे समजते.
याशिवाय सलमान खानसोबत एक ब्लॅंकेट डील करण्यात आली आहे. या डीलनुसार कलर्स चॅनलवर वर्षभरात होणाऱ्या अवॉर्ड शोमध्ये त्याला सहभागी व्हावे लागणार आहे. “बिग बॉस’ दरवर्षी सप्टेंबरमध्ये प्रसारित करण्यात येतो. परंतु यंदा लॉकडाउनमुळे त्याचे प्रक्षेपण लांबणीवर पडले आहे.
View this post on Instagram
Daane daane pe likha hota hai khane wale Ka naam… jai jawan ! jai kissan !
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सलमान खान “बिग बॉस 14’शिवाय आपल्या आगामी “राधे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच “कभी ईद, कभी दिवाळी’ आणि “किक-2′ चित्रपटातही तो काम करणार आहे.