मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त् मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या ध्वजारोहण समारंभास श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते.