नवी दिल्ली: खऱ्या वर्दीत बनावट ‘एएसआय’ दिल्लीत आढळली. कोरोनाच्या काळात या बनावट महिला पोलिसाने खूप लोकांचे खिशे कापले. कुणाला अंदाज देखील आला नाही. कारण महिलेने परिधान केलेली वर्दी खरी होती.
दिल्ली पोलिसांच्या एएसआयचा खरा गणवेश परिधान करुन एका बनावट पोलिस महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्ली जिल्ह्यातील टिळक नगर पोलिस स्टेशन भागात दिल्ली पोलिसांचा गणवेश परिधान केलेली एक महिला एएसआय कोविड -१९ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांचे चालान कापत होती.
यानंतर हवालदार सतीश आणि कॉन्स्टेबलला या महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर शंका होती. नंतर चौकशी केली असता तो गणवेश खरा असल्याचे आढळले पण तो परिधान केलीली महिला बनावट होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने आपले नाव तमन्ना जहां असे सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध संबंधित कलमांत गुन्हा दाखल केला आहे.