शिराळा (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रामध्ये 134 नवीन रुग्ण, शहरी भागात 23 रुग्ण, ग्रामीण भागात 84 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2307 वर पोहोचली आहे. मात्र बरे झालेले रुग्ण संख्या 1033 एवढी आहे. आज उपचारा खाली 1202 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 72 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच आज 81 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत.
आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 917, शहरी भागातील 178, मनपा क्षेत्रातील 1212 रुग्ण अशी आहे. ग्रामीण पेक्षा मनपा क्षेत्र रुग्ण संखेत आघाडी घेऊ लागले आहे. आजच्या नवीन पॉझिटिव्ह मध्ये आटपाडी तालुका 1,जत तालुका 16, कडेगाव तालुका 4, कवठेमंकाळ तालुका 3,खानापूर तालुका4, मिरज तालुका 34,पलूस तालुका 20,शिराळा तालुका 2, तासगाव तालुका 12, वाळवा तालुका 11, सांगली 64, मिरज 70 अशी आहे. मृतांमध्ये नळभाग सांगली येथील 68 वर्षांचा पुरुष, कृष्णाघाट सांगली येथील 59 वर्षांचा पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे : आटपाडी 128, जत 142, कडेगाव 60, कवठेमहांकाळ 72, खानापूर 53,पलूस 103, शिराळा 184, तासगाव 69, वाळवा 119, मनपा 1212 अशी आहे.