सातारा – जिल्ह्यातील आणखी 135 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3661 झाली आहे. तर आतापर्यंत करोनाच्या 130 बळींची नोंद झाली आहे. बुधवारी रात्रीच्या अहवालात कराड तालुक्यात करोनाने दहशत माजवली असून तब्बल 73 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या 135 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाण आहे. कराड तालुक्यातील वडोली बुद्रुक येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, 7 वर्षीय बालक, 60, 38 वर्षीय पुरुष, 42, 48, 32, 27 वर्षीय महिला, 5, 2 वर्षीय बालिका,
घरलवाडी येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील 35 वर्षीय महिला, बुधवार पेठेतील 20, 44 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 6, 14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शि. हॉ. कॉ. कराड येथील 47, 46 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष व 26, 27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष, कामठी येथील 67 वर्षीय पुरुष,
आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहतीमधील 45, 42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 38 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटलमधील 26 वर्षीय डॉक्टर व 25, 30, 33, 30, 32, 33, 26, 48, 52, 28 वर्षीय पुरुष व 32, 43, 42, 38 वर्षीय महिला, सदाशिवगड येथील 31 वर्षीय महिला, पाडळी येथील 50 वर्षीय पुरुष, मोपसे येथील 23 वर्षीय महिला, मंगळवार पेठेतील 62 वर्षीय महिला, बनवडी कॉलनीतील 40 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 44, 62 वर्षीय पुरुष व 54, 24 वर्षीय महिला,
सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35 वर्षीय महिला व 14,7 वर्षीय बालके, शुक्रवार पेठेतील 28, 58 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व 25 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 39 वर्षीय महिला, मलकापूर येथील 23, 49 वर्षीय महिला व 33, 55, 42 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 15 वर्षीय बालक, 45, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील करंडी येथील 50 वर्षीय महिला, सदरबझार येथील 30 वर्षीय महिला,
लिंब येथील 21, 54, 21 वर्षीय महिला व 10, 2, 9 वर्षीय बालिका व 9, 5 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 26, 45 वर्षीय पुरुष, 28, 44 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालक, लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 50, 60, 47, 40 वर्षीय महिला व 56, 35 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 41 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालक, काशीळ येथील 36 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 92, 58, 52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष,
कामथे येथील 40 वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील कासरुंड येथील 52 वर्षीय पुरुष, पाटण येथील 33 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील 66 वर्षीय पुरुष, मायणी येथील 22, 19 वर्षीय पुरुष, पुसेगांव येथील 34 वर्षीय पुरुष.,
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय बालक., खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14 वर्षीय बालक, 30 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला., फलटण तालुक्यातील बरड येथील 28 वर्षीय महिला व 7 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 45, 31 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला., कोरेगांव तालुक्यातील तडवळी येथील 63 वर्षीय महिला,
कोरेगाव येथील 21 वर्षीय महिला, वाठार येथील 70, 51 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालिका व 12 वर्षीय बालक., जावळी तालुक्यातील खरोशी येथील 66 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 57 वर्षीय महिला.
एका करोनाबाधिताचा मृत्यू
कोयनानगर ता. पाटण येथील 85 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कराडच्या मंगळवार पेठेतील 80 वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.