पुणे – कोंढवा परिसरातील न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेचे 67 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सात मुले 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक फारेहा गौस-सय्यद यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष हाजी जक्की शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
फातिमा मुन्शी हिने 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मसिरा आबीद 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर युस्रा फातेमा 92.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. शाळेचे 90 टक्केच्या वर 7, 85 टक्क्यांपेक्षा अधिक 12, 80 टक्केपेक्षा अधिक 12, 75 टक्केपेक्षा अधिक 18, 70 टक्केपेक्षा अधिक 16 तर 60 टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.