मुंबई – सिंग इज किंग, वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक हिट चित्रपट देणारी ग्लॅमडॉल म्हणजेच अभिनेत्री ‘कॅटरिना कैफ’चा आज वाढदिवस आहे. 16 जुलै 1984 मध्ये आजच्याच दिवशी हाँगकाँगमध्ये कॅटरिना जन्म झाला होता.
View this post on Instagram
भारतीय वंशाचे मोहम्मद कैफ आणि ब्रिटिश वंशाची सुजैन टरकोट यांच्या पोटी जन्मलेल्या कॅटरिनाला लहानपणापासूनच ग्लॅमरचे जग खुणवत होते. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून कॅटरिनाला जगभर ओळखले जाते.
कॅटरिना आधी टरकोट हे आईचं आडनाव लावायची. ते बदलून तिने नंतर वडिलांचे आडनाव नावापुढे लावण्यास सुरुवात केली. आज कॅटरिना कैफ हे नाव बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध आहे. करिअरच्या सुरूवातीला तिने काही मल्याळम चित्रपटात काम करावे लागले. 2004 मध्ये मल्लीस्वरी आणि 2005 मध्ये आलेल्या अलारी पेडगू या मल्याळम चित्रपटात कॅटरिना झळकली.
दुसऱ्या वर्षी कॅटरिना बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच, अभिनेता सलमान खानच्या डोळ्यात भरली. आणि ‘मैंने प्यार क्यों किया’ मध्ये सलमानने तिला कास्ट केले आणि हळूहळू सलमान व कॅटमधील जवळीक वाढली. पुढे तर सलमाननेच कॅटरिनाचे करिअर घडवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. खुद्द कॅटनेही अनेक मुलाखतीत कबुल केली कि, ‘माझ्या करिअरमध्ये सलमानचा मोठा वाटा आहे’.