राजगुरूनगर -अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून राजगुरूनगरमधून बुलढाणा येथे पळवून नेणाऱ्या तरूणाला पॉस्को कायद्याअंतर्गत पोलिसांनी अटक केली त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयदीप भारत सरदार (वय 21 रा. कुंभारआळी, राजगुरूनगर, मूळ खामगाव, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे. सरदाला पॉस्को कायद्याअंतर्गत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.