मुंंबई- लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली असली तरी करोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. यासाठी अजूनही लोक खबरदारी घेत असून लोक आवश्यक काम नसल्यास घराच्या बाहेर जाणेटाळत आहेत. बाहेर जातानाही लोक मास्क लावत आहेत. मात्र, या मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? नाही ना? मात्र, अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मास्कसाठी खास हिंदी शब्दशोधला आहे.
अमिताभ बच्चन यांनी शोधलेला हा शब्द एवढा मोठा आहे की अक्षरांचा विक्रम होईल. विशेष्ज्ञ गोष्ट म्हणजे याचे उच्चारण देखील सोपे नाही. बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
यात त्यांनी मास्क लावलेला दिसत आहे व मास्कवर त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट “गुलाबो-सिताबो’चे पोस्टर छापलेले आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, सापडला, सापडला, सापडला खूप
मेहनतीनंतर अखेर मास्कचे भाषांतर सापडले. हिंदीमध्ये “नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका!’
दरम्यान, सोशल मीडिया त्यांची ही पोस्ट आणि मास्कसाठी शोधलेला हिंदी शब्द चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी हा शब्द शोधण्यासाठी त्यांचे कौतुक केले.