पॅरिस –करोनाचा धोका कमी झाल्यानंतर युरोपातील फुटबॉल स्पर्धांना प्रारंभ झालेला आहे. आता त्याही पुढे जात फ्रान्सने देशातील विविध फुटबॉल स्पर्धांसाठी मैदानात प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
ला लीगा, स्पॅनिश लीग, बुंदेसलिगा आणि इंग्लिश प्रीमिअर लीग या स्पर्धा सुरु झाल्याने फ्रान्स फुटबॉल महासंघाने देशांतर्गत स्पर्धाही सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्पर्धांना येत्या 10 जुलैपासून प्रारंभ होणार असून फ्रेंच करंडक स्पर्धेसाठी मैदानाच्या क्षमतेच्या ठरावीक टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. ही स्पर्धा ऑगस्टअखेर संपेल.