वन प्लस काही मिनिटांतच झाला आऊट ऑफ स्टॉक

स्मार्टफोन ग्राहकांचे “बहिष्कारा’कडे दुर्लक्ष

नवी दिल्ली – चिनी उत्पादनाविरोधात बहिष्काराची भाषा वाढली असतानाच चीनच्या कंपन्याच्या स्मार्टफोनची मागणी कमी झाली नसल्याचे आढळून येत आहे. चीनमधील कंपनीने वन प्लस 8- प्रो हा फोन भारतीय बाजारपेठेत इ- कॉमर्सच्या माध्यमातून उपलब्ध केला असता काही मिनिटातच उपलब्ध फोनची खरेदी पूर्ण झाली. 

एवढेच नाही तर काही ग्राहकांनी ट्‌विटरवर फोन लवकर संपल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. चीनमधील बिबिके कंपनी वन प्लस फोन तयार करते. हीच कंपनी ओप्पो, विवो, रियलमी, इको या स्मार्टफोनची निर्मिती करते. हे सर्व स्मार्ट फोन भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

बिबिके ही फोन कंपनी विक्रीच्या बाबतीत भारतात क्रमांक एक वर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिओमी कंपनीही चीनची आहे. भारतातील दूरसंचार क्षेत्र केवळ मोबाईल हॅंडसेटवर चीनवर अवलंबून नाही तर मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्याही चीनची महत्वाची उत्पादने मोठ्या प्रमाणावर वापरतात.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत बहिष्काराचा मोबाईल वापरावर किती परिणाम होईल हे सांगणे अवघड आहे. त्यातच चिनी उत्पादनांच्या सायबर सेक्‍युरिटीचा प्रश्न आगामी काळात वाढू शकतो. त्यावर कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.