अभिनेत्री हिना खानचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या वाढून तब्बल 80 लाखांवर पोहोचली आहे. हिनाने हा खास क्षण चॉकलेट केक कापून साजरा केला, ज्याचा फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोत हिना केक घेवून दिसत आहे आणि यासह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अभिनंदन… 8 मिलियन.’ हिनाने लिहिली की, “आठ मिलियन हॅशटॅगइंस्टफॅम, आपले कुटुंब वाढत आहे आणि मला तुमच्या सर्वांविषयीचे प्रेम असून मला ते एका नवीन उंचीवर घेवून जात आहे.
मी आपल्या सर्वांची कृतज्ञ आहे. जे सुरुवातीपासूनच माझ्यासोबत राहून आतापर्यंतच्या प्रवासात माझी साथ दिली. त्या सर्वांचे मनापासून आभार. शेवटी ती लिहिते की, “आता, या प्रवासात आणखी नम्र, प्रेमळ आणि समजूतदार होण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हॅशटॅगबिगरटूबीबेटर हॅशटॅगस्ट्रॉन्गरटूगेदर. दरम्यान, टीव्ही सिरीयल “ये रिश्ता क्या कहलाता है’मधून हिना खान घरा-घरात पोहोचली आहे. तसेच हिना खान तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. याशिवाय काही महिन्यांपूर्वी आपल्या फॅशनसेंसमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.